20 फेब्रुवारी रोजी पोभुर्ले येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात साजरी होणार दर्पणकार जांभेकर यांची जयंती साजरी
देवगड
20 फेब्रुवारी रोजी पोभुर्ले येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात साजरी होणार दर्पणकार जांभेकर यांची जयंती साजरी
देवगड तालुका पत्रकार समिती यांच्या वतीने व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने केले आयोजन ; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
ज्येष्ठ पत्रकार माधव कदम लिखित मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने व जांभेकर कुटुंबिय – पोंभुर्ले यांच्या सहकार्याने २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. पोंभुर्ले येथील दर्पणकार, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृह येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यादिवशी सकाळी ११ वा. मान्यवरांचे स्वागत, ११.१० वा. दीपप्रज्वलन, ११.१५ वा. पाहुण्यांचा परिचय, ११.२० वा. प्रास्ताविक, ११.३० वा. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम लिखित ‘मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन, ११.४० वा. मान्यवरांचे मनोगत, दुपारी १ वा. समारोप असा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळित व खजिनदार श्रीकृष्ण रानडे यांनी केले आहे.