कुडाळ :
कुडाळ माठेवाडा येथे स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा यांच्यावतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘शिवजयंती सोहळा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
या सोहळ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे :
सकाळी १० वाजता शिवजन्म सोहळा, सकाळी ११ वाजता दीप प्रज्वलन, शिवज्योत आगमन, संध्याकाळी ४ वाजता महिलांसाठी विविध खेळ आणि आकर्षक बक्षिसे, संध्याकाळी ७ वाजता पारंपारिक नृत्याविष्कार आणि सत्कार सोहळा, रात्री ८ वाजता भव्य ऐतिहासिक नाटक, शिव गणेश प्रोडक्शन, सिंधुदुर्ग मुंबई निर्मित अफजल खान वधावर आधारित रोमहर्षक कलाकृती नरसिंह शिवराय या नाटकाने सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.