*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८५ वे
अध्याय – १५ वा , कविता – १ ली
___________________________
स्वामी श्री गजानना । तव चरणी प्रार्थना । उमज पडू द्या मना । घडवा मनासी गजानना ।। १ ।।
शिव जयंती उत्सवाला । टिळक बाळ गंगाधर आले अकोल्याला । अध्यक्ष तेच लाभले सभेला । थोर राष्ट्रभक्त जे ।। २ ।।
अकोल्यास टिळक येती । अफाट जन सभेस जमती ।
लोकमान्यांची कीर्ती । ठाऊक सर्वांना ।।४ ।।
काही जण म्हणाले । होईल खूप चांगले । आमंत्रण उत्सवाचे स्वामींना द्याया भले । जाऊ शेगावी आपण ।।५।।
यावर सहमती होईना । काही बोले- नका बोलावू स्वामींना।
त्यांचे वागणे कधी कसे,कळेना । विपरीत घडले तर कसे ?।। ६।।
तरी काही जण शेगावस गेले । स्वामींना भेटले । सभेबद्दल
बोलले । म्हणाले- स्वामी आपण यावे सभेसी अकोल्यास ।।७।।
म्हणे-स्वामी,पाहण्या टिळकांना । आणिक अण्णा पटवर्धनांना। भेटण्या या दोघांना । येऊ आम्ही अकोल्यास ।।८ ।।
खापर्डेना आनंद झाला । ते बोले कोल्हटकराला। बघा,
स्वामींनी वृत्तांत जाणला । अकोल्यात जो जाहला ।९।।
*********
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास- अरुण वि. देशपांडे- पुणे.
___________________________________

