You are currently viewing वणवण

वणवण

*ज्येष्ठ ले0खिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*वणवण*

 

भरदुपार झाली आहे. ऊन्हाचा तडाखा सहन होत नाही.

झाडे झुडपे स्तब्ध झालीत. वारा कधीचाच शांत झालाय. पशुपक्षी निवांत सावलीला विसावलेत.

नि:शब्दता खोलवर पसरलीय. आभाळाकडे बघवत नाही.

 

‘ ती’मात्र भान विसरल्यासारखं काम करतेय. नशिबांने ड

भाळावर कष्टकरी हा शिक्का मारलाय. वेळ कोणतीही असो. ही डोक्यावरून वीटा वहात रहाते.

पायात तर कधीच नसतं.

डोळ्यापुढे आधीची दोन लेकरं आणि संध्याकाळची चुल इतकंच दिसत असतं. स्वत:लाही पोटाची खळगी भरायची आहे हे ती विसरून गेली आहे.

चुल पेटेल तर लेकरांना चार घांस मिळतील .नवरा तर कधीच परागंदा झालाय. लेकरं सोडुन ही माय कशी व कूठे पळणार?

कधी पाठीवरच्या घुसमटलेल्या झोळीत तर कधी समोरच्या वृक्षाला बांधलेल्या झोळीत तिचे तिसरे बाळ समंजसपणे शांत बोटं चोखत झोपतं. आईला त्रास नाही देत. झोळीत तसं ऊन नाही लागत.

भूकेने मात्र बाळ रडल्यावर त्या कष्टातही तिला पान्हा फुटतो. बाळ शांतपणे पीत पीत पुन्हा झोपी जातं.

एक एक क्षण ती वीतभर पोटांसाठी गोळा करते. पैशासाठी कामी लावते. आणि चुल पेटुन मुलं जेवतात तेव्हाच ती चुलीबरोबर शांत होते.

ही खरं तर वणवण तिलाही झेपणारी नाही पण श्रद्धेने एखाद्या व्रतासारखं, वारीसारखं पार पाडते.

कधी बाळाला बरं नाहीसं होतं आणि रडणारं बाळ आईच्या पाठीवरच झोपतं. वीटांबरोबरचे हे ओझे जाणवत नाही तिला.मायेसाठी ती माय हटणारी नाही.

ते झाड बाळावर छान सावली धरी.

पानांची सळसळ झालीच तर हे बाळ पाय नाचवत पानांशी खेळत राही.आकाशाचा तुकडा पहात नाचत हंसत राही.

तिच्या डोळ्यात विलक्षण आशा चमकत असे. ही बाळं मोठी होतील. शिकतील चार पैसे कमावतील मग आपली वणवण संपेल.

 

अनुराधा जोशी

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा