You are currently viewing धरा मोहरली आज

धरा मोहरली आज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

*धरा मोहरली आज*    

 

ऋतू वसंत फुलला

धरा मोहरली आज

लेवुनिया हिरवाई

सृष्टी ल्याली नवा साज…

 

दव सांडले पानात

भुई हळू थरथरे

येता किरण कोवळे

स्मित येई मोदभरे…

 

पाखरांची फडफड

घाई चाले कोटरात

झेप उंच नभाकडे

निलरंगी दिगंतात…

 

मोहरला आम्रवृक्ष

परिमळ पसरला

कोकिळेची आर्त हाक

साद घाली मीलनाला…

 

केशरला हा पळस

अग्निशिखा दिसे जणू

राधा पहाते मोहना

कधी वाजवतो वेणू…

 

खळखळ वाहे झरा

कानी मधुर संगीत

धरा मोहरली आज

शब्दसाज कवितेत….!!

 

~~~~~~~•••••~~~~~

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा