निसर्गाचा वरदहस्त लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला, अजरामर कवी, लेखक, साहित्यिकांची खाण असलेला, सावंतवाडी संस्थानची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला, श्रीमंत बापूसाहेब महाराजासारख्या आदर्श राजाची परंपरा असलेला, स्व.बँ.नाथ पै,प्रा.मधु दंडवते,मा.सुरेश प्रभू अशा कल्याणकारी संसदीय संकेत आणि परंपरा जपणाऱ्या महान आसामींचा हा जिल्हा…. राजकीय अनुकुलतेच्या आणि प्रतिकुलतेच्या हिंदोळ्यावर झोके घेणारा हा जिल्हा.परमेश्वराने स्वर्गीय सुख निसर्गाच्या रुपाने अगदी भरभरुन दिलं….
पण राजकीय श्रेयवाद,अहंकार आणि आत्मकेंद्रित राजकारण यामुळे या जिल्ह्यातील जनता आजही खऱ्या विकासापासून दुर आहे…कारण शाश्वत विकास आणि निसर्ग याचा समतोल राखण्यासाठी सामुहिक प्रयत्न झाले नाहीत.
या जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या मर्यादा पुन्हा एकदा कोरोनाच्या भीषण संकटामुळे अधोरेखित झाल्या. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय की खाजगी…??याबाबतचेही त्या त्या स्तरावर राजकारण झाले.हे कुणीही नाकारणार नाही.
मा.नारायणराव राणे यांच्या पडवे येथील त्यांच्या स्वप्नातील हाँस्पिटलचे उदघाटन होण्यापूर्वी काम प्रगतीपथावर असताना साधारण वीस मिनिटाहून जास्त चर्चा करण्याचा योग मा.राणेसाहेब व निलम वहिनी यांच्याबरोबर आला.तेव्हा राणेसाहेब म्हणाले होते”काही महिन्यातच मी हाँस्पिटलचे उदघाटन करणार…पण कितीही अडचणी आल्या तरी मेडिकल काँलेज सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”…कितीही आर्थिक झळ सोसावी लागली तरी माझ्या जिल्ह्यातील सर्वसामान्याना उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत.
या हाँस्पिटलच्या उदघाटनला मी होतो.अनेक मान्यवर मंत्री उपस्थित होते…मा.शरद पवारही उपस्थित होते.त्या उदघटनाच्या शुभेच्छापर संबोधनात मा.पवारसाहेब म्हणाले होते “हे भव्यदिव्य वैद्यकीय संकुल खरं तर मोठ्या शहरात राणेसाहेबानी बांधल असत तर बक्कळ पैसा मिळाला असता…पण आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यातील जनता आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये म्हणून नारायण रावांनी मोठी आर्थिक झीज सोसून हा प्रकल्प साकारलाय.हे फक्त राणेचं करू शकतात.”
उदघाटन झाल्यावर अनेकदा काही रूग्णाना घेऊन मी तेथे जात असतो तर काहीना दुरध्वनीवरुन संपर्क साधून मदत करत असतो.या ठिकाणी केंद्र आणि राज्यसरकारच्या अनेक आरोग्यदायी योजनामधून अनेक गोरगरिबांना मोफत उपचार मिळत असून त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २४तास खास कक्षही स्थापन केलेला आहे.विविध विषयाचे तज्ञ डॉक्टर,कर्मचारी वर्ग येणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने वागतो…एस्.एस्.पीएमच्या जनरल मँनेजर सौ.अपूर्वा पडत,वैद्यकीय अधिक्षक कुलकर्णी सर ही सर्वच मंडळी तेथील व्यवस्थापन अतिशय गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पाडत आहेत…जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव असताना मा.नारायण रावांनी आपली स्वप्नपूर्ती केलीच पण सर्वसामान्याना एक हक्काचे वैद्यकीय सुविधांच दालन उपलब्ध करुन दिलं..
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणे हा जिल्ह्याच्या द्रुष्टीने अभिमानाचा विषय.पश्चिम महाराष्ट्रात सर्वपक्षीय राजकारणी मंडळीने अशी सुविधा कोणत्या पक्षाचा नेता आणतो हे कधीच पहात नाहीत… विकासाच्या कामात राजकारण आणता नये हा या सर्वच मंडळीचा आग्रह, पण दुर्दैवाने आपल्याकडे राजकीय श्रेयवाद आणि अडवाडवी एवढी असते कि तो “विकास”पळून जातो.
येत्या सहा फेब्रुवारीला मा.नारायणराव राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन देशाचे होममिनीस्टर मा.अमीतभाई शहा यांच्या शुभहस्ते होत आहे….पडव्याचा हा राणे कुटुंबिया़चा आरोग्यविषयक भव्यदिव्य प्रकल्प कात टाकत आहे…आवश्यक ते अनेक सकारात्मक बदल जलद गतीने होत आहे..राजकारण विसरून आपण सर्व सिंधुदुर्ग वासियांनी नारायणरावांच्या या स्वप्नपूर्तीला मनोमनं शुभेच्छा देऊया.
…Adv Nakul Parsekar …
Savantwadi… Sindhudurg