You are currently viewing माणगाव जि. प. शाळेचा सुवर्ण महोत्सव व सभामंडपाचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

माणगाव जि. प. शाळेचा सुवर्ण महोत्सव व सभामंडपाचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

*माणगाव जि. प. शाळेचा सुवर्ण महोत्सव व सभामंडपाचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*

*प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद- वैभव नाईक*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगांव या प्रशालेला ५० वर्ष पूर्तीनिमित्त सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त रविवारी आयोजीत कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्रशालेत उभारलेल्या सभामंडपाचे देखील उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका कृष्णा धुरी, माजी जि. प. सदस्य रमा ताम्हाणेकर, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभाग संघटक कौशल जोशी,माणगाव शहर प्रमुख सचिन भिसे, गटशिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक नानचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश कदम, मुख्याध्यापक संजना पेडणेकर,सहाय्यक शिक्षक श्री भोई, उद्योजक काका केसरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील सावंत, ग्रा. प. सदस्य बंटी भिसे, मनाली धुरी, अवधूत गायचोर, संदीप सावंत, संजना धुरी, सौ आडेलकर, सौ सावंत, काजल नाईक, बाबुराव कदम, अनुष्का तेली, गुरु माणगावकर, रुपेश नानचे, प. भ. चव्हाण, माजी शिक्षक श्री खांबकर, पंढरी कदम,श्री कांबळी आदीसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक , विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा