You are currently viewing नांदगाव येथे घराला लागली अचानक आग   

नांदगाव येथे घराला लागली अचानक आग  

नांदगाव येथे घराला लागली अचानक आग

कणकवली

नांदगाव येथील मोरये वाडीमध्ये मनोहर आत्माराम बिडये आणि पूजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले. सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात आणणे कठीण जात होते.

मुंबई-गोवा महामार्गावर बिडये कुटुंबाच्या घराला आग लागली. बिडये कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास असतात, तर श्रीमती सुनंदा बिडये या आजी येथे राहत होत्या. मात्र, तब्येत ठीक नसल्याने त्या काही दिवसांपूर्वी मुंबईला गेल्या होत्या. या घरात लवू राजाराम लाड यांचे किराणा मालाचे दुकान होते, परंतु हे दुकानही मागील महिन्याभरापासून बंद होते.

सुमारे रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवले. मात्र, अग्निशामक बंब साधारण एक तासाने घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत आगीने संपूर्ण घर आपल्या विळख्यात घेत रौद्र रूप धारण केले होते. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, याच वेळी घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने नागरिक घाबरले.

आग कशामुळे लागली हे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कणकवली व कासार्डे पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा