” डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजने”साठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी ” डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन 2024-25 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन 2024-25 या वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत.
या प्रस्तावमध्ये water purifler व Solar Inverter या 2 पायाभूत सोयी सुविधांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात यावा. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील शासन निर्णय क्र. अविवि-2010/ प्र.क्र.152/10/का.6, दि. 11/10/2013 मध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.

