*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*समेवर आघात..माझ्या शब्दांचा..!*
पिळदार शब्द माझे
आंगोपांगी भस्म चोपडले
रोमांचला शब्दांचा कुंभमेळा
खळांची व्यंकटी सांडले…
बौद्धिक खुमखुमी शब्दांना
वृत्तीचे कवडसे उमटले
समेवर आघात शब्दांचा
संगमी अश्रू दाटले..
मढले कांचन मुक्याने
कंठामध्ये सर्प शब्दांचे
कलहाखेरीज काही नाही
दुखण्याचे मूळं फितूरीचे..
जातीनिहाय जनगणना शब्दांची
डोक्यांत विष आरक्षणाचे
जरतरची भाषा शब्दांची
चुकीच्या समेवर आघाताचे..
आपलाच वाद आपल्याशी
पसायदानाचा अर्थचं कळला..नाही
गंगापाण्यात पाप धुतांना
पुण्याचा हिशोब ठेवला…नाही
बाबा ठाकूर

