आयुष्यात चांगले प्रयत्न करा निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल: पोलीस निरीक्षक सौरभ कुमार अग्रवाल
एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन..
कुडाळ
कॉलेज जीवन संपल्यावर प्रत्येकाला रियल लाईफला जावे लागते ते चॅलेंज स्वीकारून आपण कशा प्रकारे पुढे जातो हे महत्त्वाचे असून यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आयुष्यात चांगले प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल. जिल्ह्यात एम.आय.टी.एम. चे नाव सर्वांत अग्रेसर होईल आणि याची ख्याती कायम टिकून राहील असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले. जयवंती बापू फाउंडेशन संचलित सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जल्लोषात उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.