*जिल्हास्तरीय खौखो खेळामध्ये बांदा केंद्रशाळेला उपविजेतेपद*
*बांदा*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ मधील खोखौ क्रीडा प्रकारात लहान गटात पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेला उपविजेतेपद मिळाले. ओरोस येथील डाॉन बास्को हायस्कूलच्या मैदावर हा क्रिडा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्हयातील आठही तालुक्यातील संघ सहभागी होते.सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बांदा केंद्रशाळच्या संघात दीपराज गवस,शुभम झोरे, सिताराम परब,शेखर बांदेकर,प्रेम लमाणी,गणेश वाघमारे,बाबुराव गवस,रवींंद्र निषाद,इब्राहिम शेख,विनायक करंबळकर,श्रेयश पाटील,अंश सावंत हे खेळाडू सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना उपशिक्षक रंगनाथ परब सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंना सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र व मेडल देऊन उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या खेळाडूंचे शाळेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ,उपशिक्षक जे.डी.पाटील,रंगनाथ परब , फ्रान्सिस फर्नांडीस,रसिका मालवणणकर,स्नेहा घाडी,शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,कृपा कांबळे, मनिषा मोरे,सुप्रिया धामापूरकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.