फोंडाघाट बाजारपेठेत बिनदिक्कत ओव्हरलोड वाहनांची वाहातुक सुरू
फोंडाघाट
*फोंडाघाट वरुन बिनदिक्कत डबल चाके ओवरलोड ट्रक, लक्सरी बस, कंटेनर सिमेंट लोडेड मिक्सर ट्रक वाहातुक बाजारात सुरू आहे. ज्याप्रमाणे गडमठ नदीवर ॲक्सिडेॅट झाला, त्याची पुनरावृत्ती होण्याची प्रशासन पोलीस वाट पाहात आहे काय? बाजारपेठेत लोकांना चालताना कसरत करावी लागते.यासाठी मंत्री नितेशजी राणे यांना अजित नाडकर्णी निवेदन सादर करणार आहेत. एसटी स्टॅंड श्री.राधाकृष्ण मंदिर, ग्रामपंचायत समोर, रबर स्पीड ब्रेकर घालावेत यासाठी अजित नाडकर्णी पाठपुरावा केला जाणार आहे मंत्री महोदय यात नक्कीच लक्ष घालुन वाहातुक नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करतील याची पुर्ण खात्री असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.