मळेवाड येथे २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
पतित पावन भक्ती मंदिर,श्री गजानन महाराज मंदिरात साजरा होणार प्रकट दिन सोहळा
विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन
सावंतवाडी
पतितपावन भक्ती मंदिर ,मळेवाड येथे श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .
बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मूर्तीस्थापना दिवस:- सकाळी १०:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती , महाप्रसाद
सकाळी १०:०० वा.पासून उत्सवासाठी सुमारे १०,००० भाकऱ्या भाजण्यास प्रारंभ.
गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी “प्रकट दिन सोहळा” यानिमित्त कार्यक्रम :- सकाळी ८:०० वाजता “श्रीं” ची महापूजा,सकाळी १०:०० वाजता श्री. ह.भ.प.श्री.गोरेबुवा .तुळस यांचे सुश्राव्य कीर्तन, दु. महानैवेद्य , दु.१२:३० वा.आरती, महाप्रसाद,तसेच झुणका भाकरी प्रसादाचे वाटप.महिलांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम.
श्री गजानन महाराज मंदिर : प्रकट दिन सोहळा,सकाळी ६:०० ते ९:०० पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक आणि महापूजा सकाळी ९:३० ते दुपारी १२:०० वा.श्री दत्तमालामंत्र अनुष्ठान ,दुपारी १२:३० वा .ते १:०० महाराजांची महाआरती (प्रकट समय) दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद ,दुपारी २:०० ते ५:०० वा.गायन आणि भजनाचा कार्यक्रम गायक ,गायक- श्री विठ्ठल गावस गायक- श्री सुरेश केरकर ,गायक – श्री सत्यनारायण कळंगुटकर, हार्मोनियम- श्री गोरक्षनाथ म्हामल,तबला – श्री रुपेश पंडित सायंकाळी ५:०० वा.ते ६:३० वाजता भजनाचा कार्यक्रम लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी कुडाळ ,सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री विनोद चव्हाण ,पखवाज श्री तुषार लोट ,तबला शिवराज पोईपकर, सायंकाळी ७:०० वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा रात्रौ ८:३० वाजता महाआरती, रात्रौ ९:३० वाजता श्री गंगाळ देव नाट्य मंडळ बीद्रुबाग मांजरे गोवा प्रस्तुत फिरत्या रंगमंचावरील महान तीन अंकी नाटक “तो मी नव्हेच” लखोबा लोखंडे च्या भूमिकेत अनिल मनोहर आसोलकर, लेखक- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर , मार्गदर्शन सौ जान्हवी प्रभाकर पणशीकर,
तरी या प्रकट दिन सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री गजानन महाराज सेवा मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.