*शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर रंगणार काव्य मैफल व शिवबा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन-*
नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय ,पुणे वतीने शिवनेरी किल्ला येथे”शिवबा”या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. यात महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कविता शिवाजी महाराजांच्या जीवनावरील या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
तसेच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे दिमाखात प्रकाशन करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी उपस्थित असणाऱ्या व सहभागी होणाऱ्या कवी कवयित्रींची अनोखी “काव्य मैफल “सुद्धा संपन्न होणार आहे. ज्यांना सहभागी व्हायचं आहे .त्यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी १९ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता हजर राहणे अपेक्षित आहे. तेथून सर्व एकत्र येऊन शिवनेरी किल्ला सर करणार आहे.
संस्थेच्या वतीने अनेक वेगळे उपक्रम वेळोवेळी संपन्न केले जातात. हा आगळावेगळा उपक्रम शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त संपन्न होणार आहे.
अशी माहिती संस्था अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.