You are currently viewing आंबोलीत भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

आंबोलीत भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

आंबोलीत भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

कारचालकावर गुन्हा दाखल

सावंतवाडी

भरधाव कारने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शुभम दिनेश परब (वय २३, रा. डीचोली गोवा ) हा युवक गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी कारचालक सचिन सुरेश भाईगडे (वय ४०, राहणार आजरा ) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दुपारी अडीच वाजता आंबोली घाटातील मुख्य धबधबा परिसरात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी चालक शुभम परब हा आपल्या ताब्यातील रॉयल एनफिल्ड दुचाकी घेऊन आंबोली मार्गे गोव्याच्या दिशेने जात होता. याच दरम्यान कारचालक सचिन भाईगडे हा सावंतवाडीतून आंबोलीच्या दिशेने भरधाव जात होता. घाटातील धबधबा परिसरात समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीला बसली. यात शुभम परब याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचाराकरता आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले.

तिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व तिथून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले.दरम्यान, या अपघात प्रकरणी दुचाकीस्वार शुभम याने दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालक सचिन भाईकडे याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा