नट वाचनालयाचा नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार पूर्णिमा गावडेंना प्रदान…
बांदा
नट वाचनालयाचा कै. प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी रोणापाल येथील मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती पूर्णिमा गावडे-मोरजकर, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्य प्रकाश पाणदरे, सौ. स्वनिता सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश माजगावकर, शंकर नार्वेकर, जयंत पिंगुळकर, सौ. शुभांगी पिंगुळकर, संतोष वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री केसरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून श्रध्दांजली वाहण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी साहित्यिका सौ. गावडे-मोरजकर यांचा वाचनालयाचे अध्यक्ष श्री सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. गावडे-मोरजकर म्हणाल्या, हा माझ्या जीवनातील पहिलाच पुरस्कार असून ज्याठिकाणी माझे बालपण व शालेय शिक्षण झाले त्याठिकाणी माझा झालेला सन्मान हा न विसरता येण्यासारखा आहे. यावेळी त्यांनी आपला गजाल गाथण काव्यसंग्रह वाचनालयाला भेट दिला.
यावेळी वाचनालयाचे संचालक जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, रोणापालचे माजी सरपंच प्रकाश गावडे, उदय देऊलकर, प्रवीण परब, कास सरपंच प्रवीण पंडित, राकेश परब, अजित दळवी, उदय गावडे, प्रफुल्ला गावडे, प्रिया केतकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक तसेच वाचक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
