रेडी यशवंतगड येथे १९ रोजी शिवजयंती
रेडी
येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड)यांच्यातर्फे बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी रेडी यशवंतगड येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता शिरोडा येथील देवी माऊली मंदिरात ओटी भरून बाईक रॅलीने सुरुवात होईल. सकाळी ८ वाजता शिरोडा बसस्थानक येथील शिवप्रतिमेचे पूजन व नंतर शिरोडा बाजारपेठेतून बाईक रॅलीने ८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथे आगमन होईल. नंतर किल्ले यशवंत गडावर बाईक रॅलीने प्रस्थान होईल. गडाच्या पायथ्याशी पालखीवर फुलांची उधळण करीत जयघोष करण्यात येईल. सकाळी ९ वाजता किल्ले यशवंतगड येथे पूजनस्थानी पालखी पोहोचेल. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक मूर्ती पूजन होणार आहे. नंतर जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा होणार आहे. शिवप्रेमींनी कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.