सर्प विज्ञान, मुलांच्या आहारावर गोपुरीत उद्या रविवारी मार्गदर्शन
कणकवली :
वागदे येथील गोपुरी आश्रम येथे जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत उद्या सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मुलांचा दैनंदिन आहार आणि सर्प विज्ञान विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
गोपुरी आश्रमातील चिकूच्या बागेत होणाऱ्या या मार्गदर्शन वर्गात डॉ. नीलेश कोदे हे मुलांच्या दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन करून मुलांशी हितगुजही साधणार आहेत.
सर्पमित्र प्रतीक सावंत आणि सहकारी सर्प विज्ञान विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन वर्गामध्ये पहिली ते नववीतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी येताना पेन, वही, पाणी बॉटल घेऊन यावे. वर्गात सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. यासाठी सदाशिव राणे, संदीप सावंत, विनायक सापळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोपुरी आश्रम तर्फे करण्यात आले आहे.