You are currently viewing मराठी वाङ्मय परिषद, बड़ोदा येथे लेखिका गायत्री मुळे यांना दोन पुरस्कारांनी केलं सन्मानित

मराठी वाङ्मय परिषद, बड़ोदा येथे लेखिका गायत्री मुळे यांना दोन पुरस्कारांनी केलं सन्मानित

*”वास्तुपुरुष” कादंबरी सर्वोत्कृष्ट तर “हस्तलिखित” कथा प्रथम पुरस्कार*

गुजरात :

मराठी वाङ्मय परिषद, बडोदा इथे दर वर्षी अखिल भारतीय स्तरावर साहित्य स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचा सोहळा ९ फेब्रुवारी रोजी श्रीमती चिमणाबाई हायस्कूल बडोदा इथे द्विदिवसीय संमेलनात पार पडला. नागपूर येथील लेखिका सौ. गायत्री मुळे ह्यांना तिथे दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वास्तुपुरुष ह्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरी हा अखिल भारतीय स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच हस्तलिखित हा कथेसाठी सुद्धा त्यांना तिथे प्रथम क्रमांक मिळाला.

गायत्री मुळे ह्यांची ही चौथी कादंबरी आहे. पानगळ, पारो आणि परब्रह्म ह्या तीन यशस्वी कादंबरी लेखना नंतर त्यांनी वास्तुपुरुष ही कादंबरी लिहिली. विशेष म्हणजे बडोदा येथील पुरस्कार हा ह्या कादंबरीला मिळालेला पाचवा पुरस्कार आहे.

साहित्य विहार संस्था नागपूर,

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट कराड,

शब्दकळा पुरस्कार, मंगळवेढा,

प्रज्ञा बहु उद्येशीय साहित्य मंच पुणे,

मराठी वांगमय परिषद बडोदा

असे पुरस्कार ह्या कादंबरीला प्राप्त झाले आहेत.

अत्यंत उत्तम नियोजित समारंभात श्री उदयजी निरगुडकर ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा