You are currently viewing जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन

जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन

जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे अशा माजी सैनिक, माजी सैनिक, विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी त्यांच्या कुटुंबावरील अन्याय / अत्यांचारविषयी समस्या व इतर काही प्रलंबित अडीअडचणी असल्यास सदर प्रकरणांचा लेखी अर्ज व सर्व कागदापत्रासह व त्याबाबत यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहारासह संबंधित तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयात नमुद केलेल्या तारखेस उपस्थित रहाण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

  जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी. वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय/ अत्याचारांसंबंधीत व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तालुक्याच्या अधिनस्थ समस्या पोलीस यंत्रणा, नगरपंचायत/नगरपरीषद विषयी समस्या तसेच पंचायत समिती विषयी मुद्दे यावर असणाऱ्या समस्याचे निवारण करण्याकरीता तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे आयोजन करण्यास शासनाने कळविले आहे. त्या अनुषंगाने  निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिद्र सुकटे  यांनी खालीलप्रमाणे तालुस्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित तहसिलदार कार्यालयात बैठकीचे/ मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

          दिनांक तालुका
दि. 18 फेब्रुवारी 2025 सावंतवाडी
दि. 21 फेब्रुवारी 2025 दोडामार्ग
दि. 25 फेब्रुवारी 2025 कुडाळ
दि. 28 फेब्रुवारी 2025 कणकवली
दि. 4 मार्च 2025 वेंगुर्ला
दि. 7 मार्च 2025 मालवण
दि.11 मार्च 2025 वैभववाडी
दि.13 मार्च 2025 देवगड

         

या मेळाव्यात या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहीती देण्यात येणार आहे. तसेच त्यांना महीला बचत गट स्थापन करण्यास प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा पत्नी यांना निवृत्ती वेतनाबाबत स्पर्श प्रणालीत (SPARSH Portal) येणाऱ्या अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातुन माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा पत्नी यांना देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक मदती व इतर कामकाज हे दिनांक ०१ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईन (OnLine) पध्दतीने सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता / बीरपिता यांचो ऑनलाईन (On Line) नोंदणी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik.maharashtra.gov.in  या संकेस्थळावर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र-०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा