You are currently viewing शेंग कोवळी ( लावणी )

शेंग कोवळी ( लावणी )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*

 

*शेंग कोवळी ( लावणी )*

 

शेत वालाचं पिकून आलं, घ्या शेंग चाखूनी

भरास आलं दानं सारं, नका पाहू रापुनी

पौषातल्या थंडी संगे

तयार झाली पिकं

सुगंध त्याचा मनात शिरता

राघू झालं मुकं

फुल वालाचे हुंगून घ्या हो काळवेळ पाहुनी

भरास आलं दानं सारं नका पाहू रापुनी

दाणे भरले शेंग कोवळी

जशी वयात आली पोर

लवलव त्याची पाहुन

सारे गोळा झाले चोर

धसमुसळे ते नकोच हात, घ्या अलगद काढुनी

भरास आलं दानं सारं, नका पाहू रापुनी

उभे पीक हे तयार झाले.

कुणा हाती सोपवू ?

कुठून आल्या निमंत्रणाना

कसे सांग थोपवू.

रसरशीत ती शेंग कोवळी, घ्या ओठा लाऊनी

भरास आलं दानं सारं, नका पाहू रापुनी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा