*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुरम्य संधिकाल*
****************
सुरम्य संधिकालातुनी
आविष्कार प्रसन्नतेचा
तुझे रूप असे लाघवी
स्पर्श हळवा भावनांचा
शब्दशब्द ओघळणारा
जणू भक्तीभाव प्रीतीचा
भवताली माहोल मनोहर
तृप्तलेल्या सुंदरम सृष्टीचा
भावफुलांची परडी न्यारी
आस्वाद घ्यावा सुगंधाचा
गीतात माळूनी ऋतुऋतूंना
आनंद घ्यावा मोक्षमुक्तीचा
तिथेच भेटतो रे जगजेठी
कृपावंती कृपाळू मायेचा
जगण्याचेही भान हरपते
सत्यार्थ कळतो जीवनाचा
**********************
*( 11 )*
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )
*( 9766544908 )*