सिंधुदुर्गात 59 अंगणवाडी सेविका – 312 मदतनीस भरतीला मान्यता
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी
सिंधुदुर्गनगरी :
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात 59 अंगणवाडी सेविका, 312 मदतनीस भरतीला मान्यता मिळाली आहे जिल्हयातील रिक्त पदांची भरती 28 मार्च 2025 पूर्वी केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमांअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील 7 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 59 तर मदतनीसांची 312 पदे भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना 24 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे.
जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.त्यासाठी तालुका स्तरावरील प्रकल्प अधिकारी स्तरावर संपर्क करावा व अर्ज करण्याचे आवाहन केले आहे
सावंतवाडी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 50, कणकवली प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका 10 व मदतनीस 58, मालवण अंगणवाडी सेविका 15 व मदतनीस 45, कुडाळ अंगणवाडी सेविका 11 व मदतनीस 76, वैभववाडी अंगणवाडी सेविका 7 व मदतनीस 14, देवगड अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 44, दोडामार्ग अंगणवाडी सेविका 3 व मदतनीस 25 अशी भरती प्रकल्प अधिकारी स्तरावर राबविण्यात येणार आहे.