You are currently viewing दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार सन 2024-25 पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाद्वारे आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर यावर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. खेळाडू विद्यार्थी/जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी aaplesarkar.mahaonline.gov.in  या लिकच्या माध्यमातून आपले सरकार अॅपद्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे.

खेळाडूने जिल्हा क्रीडा कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये, असा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये, असे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शितल शिंदे मोबा. (९२०९१३४४३४) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा