पडेल मंडल मधील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये केला प्रवेश
*मंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना देवगड मध्ये दुसरा झटका
*वाडा गावचे सरपंच,गिर्ये ग्रामपंचायत सदस्य,वाडा शाखा प्रमुख असे शेकडो पदाधिकारी भाजपात.
*प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश
ओरोस
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या धडाकेबाज कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पडेल मंडल मधील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी सरपंच ,सदस्य यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. यात वाडा गावचे सरपंच सुनील रोहिदास जाधव वाडा शाखा प्रमुख पुष्कांत वाडेकर व ग्रामस्थ, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य कीर्ती कृष्णा घाडी तसेच ग्रामस्थ,फणसे, गिर्ये , मणचे,गोवळ येथील ग्रामस्थ अशा शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. ओरोस येथे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण यांच्या हस्ते भाजप कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी पडेल मंडल मधील प्रांजल जाधव, अनिता यादव,कीर्ती माळगवे,अर्पिता राघव, मानसी बिर्जे, पूजा सरवणकर,स्वाती घाडी, सुविधा कानडे, ऐश्वर्या कांबळे, कविता अनभवणे, नमिता माणगावकर, वैष्णवी बांधकर, राखी लाड, शशिकांत वाडेकर संतोष वाडेकर दिलीप वाडेकर मिलिंद वाडेकर उमेश वाडेकर धनाजी भांबल प्रवीण मांजरे , चंद्रशेखर जाधव रमेश जाधव किरण जाधव सुमित जाधव संतोष जाधव सुधीर जाधव सुभाष वाडेकर साईराज जाधव अभिजीत जाधव आतिश जाधव शरद कांबळे या वाडा येथील ग्रामस्थांनी उबाठा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
तर गिरी येथील कृष्णा गाडी मंगेश घाडी गुरुनाथ घाडी सचिन घाडी सुवास घाडी सूर्यकांत घाडी अंजनी घाडी तेजस्विनी सुधीर घाडी यांनी पक्षप्रवेश केला.फणसे येथील दीक्षा थोटम, सुरेखा नवलु, अस्मिता थोटम, समिधा थोटम,प्रगती राऊळ, सुप्रिया राऊळ, मयुरी तांबे, शैलेश थोटम, ओंकार राणे,अशा उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला.