*”महाराष्ट्र श्री” विजेता संदेश सावंत यांचा सत्कार*
*बांदा भाजपातर्फे केला गेला सन्मान*
बांदा
महाराष्ट्र स्टेट बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप 2025 अंतर्गत अमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या “महाराष्ट्र श्री” या मानाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या तांबुळी गावचे सुपुत्र श्री संदेश सावंत यांना आज बांदा भाजपा तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठित अशा या स्पर्धेत संस्मरणीय यश मिळवल्याबद्दल संदेश सावंत यांचे अभिनंदन देखील करण्यात आले.यावेळी बोलताना भाजपाचे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर यांनी सांगितले की, तांबुळी सारख्या छोट्या गावातून येऊन बांदा शहरात बांदेश्वर फिटनेस क्लबची स्थापना करून अशा प्रतिथयश स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे ही फार मोठी भरारी आहे. ही त्यांची कामगिरी युवकांना प्रेरणा देणारी आहे.आम्हाला त्यांच्या या यशाचा अभिमान आहे. बांदा पंचक्रोशीच नव्हे तर सिंधुदुर्गातील युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जिल्ह्याचे नाव असेच उंचवावे.
यावेळी बांदा भाजपा पदाधिकारी मनोज कल्याणकर,शामसुंदर मांजरेकर ,सागर सावंत,निलेश उर्फ पापू कदम, निलेश सावंत,शैलेश केसरकर, स्वप्निल सावंत, अक्षय पेडणेकर,शुभम देसाई, शैलेश सावंत, मनोज नार्वेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————–
आज झालेला सत्कार हा माझ्यासाठी उत्साह वाढवणारा आहे.तरुण युवकांनी व्यसनाधीन होण्यापेक्षा व्यायाम करून शरीर बळकट करावे व निरोगी बनावे.केवळ क्रिकेट नव्हे तर या क्रीडा प्रकारात देखील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा याकरिता मी यापुढे निश्चित प्रयत्न करेन. आजचा सत्कार कायम स्मरणात राहील – महाराष्ट्र श्री संदेश सावंत