You are currently viewing बाप

बाप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप*

 

दूर बांधावर उभा

बाप माझा थकलेला

पाटाच्या पाण्यात गायी

पंढरीच्या विठ्ठलाला

 

ढेकळात उभा राही

पायी फाटकी चप्पल

त्याच्या पाया येती फोड

त्याची कुणा ना दखल

 

कष्ट करी शेतामंदी

कधी नाही तो थकला

स्वप्न त्याच्या डोळ्यामध्ये

घरासाठी तो राबला

 

बाप आधार घराचा

जीवनात कष्ट करी

त्याच्या राबत्या हाताची

खावी सुखाची भाकरी

 

काय सांगु माझा बाप

कसा दिसे दीनवाणी

त्याची झिजली गं हाडे

माझ्या डोळ्या येई पाणी

 

जन्म लागला सार्थकी

असा बाप मिळे मला

येईन मीचं पोटी

पुढच्याही जन्माला

 

*शीला पाटील नाशिक* .

प्रतिक्रिया व्यक्त करा