*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
————————
जग आपले बरे
———————-
मरगळ जाते निघूनी मन कात टाकते
नवी पहाट उगवे मन उल्हासित होते ।।
दिवसभर करावे श्रम अथक कितीही
सुख दाखवी वाकुल्या,मनी निराशा येते ।।
बागेत उमलती फुले सुगंधी सुंदर किती
उदास अंधारी रात्र ,हलके निघूनी जाते ।।
उबदार खिसे श्रीमंत ,मने कंजूष किती
ना कणव ना दया मनी कधी ना येते ।।
बुभुक्षित नजरेची गिधाडे टपून असती
वाट पाहती सावज कधी टप्प्यात येते ।।
जीवावर उठती, मित्र म्हणवणारे कधी
नाते काळजाचे कुठे कसे हरवून जाते ।।
बगळे दिसती फसव्या शुभ्र रंगातले ते
कृष्ण-कृत्यात बरबटलेले हात त्यांचे ते ।।
बरे असते मित्रा, जग आपले सरळ ते
कुणी ना कुणी मदतीला ते धावून येते
————————————————
कविता जग आपले बरे
अरुण वि.देशपांडे पुणे
9850177342
————————————————-