मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत टोपिवाला हायस्कुलच्या पालक सौ. मिरा तोतरे प्रथम
स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद
मालवण
मालवण-केंद्रातील शाळांची प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय स्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रघुनाथ देसाई विद्यालय या प्रशालेत तृणधान्य पाककला कृती स्पर्धा घेण्यात आली. स्वयंपाकी, मदतनीस, ग्रामस्थ, पालक यांनी स्पर्धेत भाग घेतला.
प्रथम क्रमांक सौ. मिरा सखाराम तोतरे पाककृती-तृणधान्याचे धपाटे (टोपीवाला हायस्कुल), द्वितीय सौ. जान्हवी रामचंद्र चव्हाण, मक्याचे कटलेट (एम. एम. परुळेकर प्राथमिक शाळा) तृतीय सौ. प्रिया गणेश मोरजकर नाचणीचे अप्पे(भंडारी प्राथ.शाळा) उत्तेजनार्थ – सौ. पिंगल विकास रुपनर तृणधान्याचे धपाटे (र. दे. विद्यालय मालवण) सौ. रेणुका मंगेश करलकर (जि. प.शाळा मालवण देऊळवाडा), सौ.रिया राजेश वराडकर नाचणीचे घावणे (दांडी मालवण शाळा) यांना गौरवण्यात आले.
पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला, अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात.
स्पर्धेचे परिक्षण मास्टर शेफ विजेत्या सौ. आरती कांबळी-वायंगणकर, नितीन पाटिल, संदीप गावडे यांनी केले. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
सर्व विजेत्या स्पर्धकांचा विशेष सन्मान व गौरव मालवण वरिष्ठ विस्तार अधिकारी उदय दीक्षित, मालवण केंद्रप्रमुख शिवराज सावंत, सौ.आरती कांबळी, वायंगणकर , नितीन पाटिल, संदीप गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सौ.श्वेता यादव, सौ.अमृता राणे, सौ.आदिती ठाकुर, सौ. चित्रा गुंजाळ उपस्थित होते. तालुकास्तरीय पाककला स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सौ. मिरा सखाराम तोतरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.