You are currently viewing पायी वाकल “तिच्या” आस्मान

पायी वाकल “तिच्या” आस्मान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पायी वाकल “तिच्या” आस्मान*

 

कोकीळे सारखी लपून झाडीत

*लपंडाव* तू कां *खेळते?*

हिरवी *सुपर्णी* येऊन कानात

रोजच सकाळी *मज* सांगते

//1//

लपलीस कितीही दाट झाडीत

नजर करते *पाठलाग* छान

“कोकीळ कंठी”आवाज तुझा

गाताना नसते तुजला *भान*

//2//

लपंडाव खेळून आपण थकलो

हवीत कशाला *झाड झुडप*

*स्वच्छ* असतात मने आपली

नजरही “वागते” *निष्पाप*

//3//

अशाच एका *रम्य* सकाळी

ऐकून *मारवा* धावत आलो

तल्लीन होऊन *गात* होतीस

त्यावर आपण *खूप* खीदळलो

//4//

हिरवी झाडी आणि *कोकीळ*

पूजलेत आपल्या *पाचविला*

*रंग रूप* पाहून *नाही गं*

मधाळ आवाज येथे स्थिरावला

//5//

असावा लागतो *हात डोईवर*

मेहेनत केली तिने *तूफान*

नव्हत *रूप* जरी *लतेला*

पायी वाकल तिच्या *अस्मान*

//6//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा