You are currently viewing बांद्यात 15 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

बांद्यात 15 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

बांद्यात 15 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

बांदा

शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा तर्फे मुलांच्या वक्तृत्व शैलीला वाव मिळण्यासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण 3 गटात होणार असून येथील बांदा केंद्रशाळा नं. १ येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत दुसरी ते चौथी गटासाठी ‘स्वराज्याचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे’ हा विषय असून वेळ ४ ते ५ मिनिटे ठेवण्यात आला आहे. पाचवी ते सातवी या गटासाठी ‘संस्काराचे व्यासपीठ राजमाता जिजाऊ’ आणि ‘शिवरायांचा तिसरा डोळा अर्थात बहिर्जी नाईक’ हे विषय असुन ५ ते ६ मिनिटे वेळ ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आठवी ते दहावी य गटासाठी ‘शिवाजी महाराज आणि कोकण प्रांत’ व ‘शिवाजी महाराजांचा आरमार विषयी दृष्टीकोन’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी वेळमर्यादा ही ६ ते ७ मिनिटे ठेवण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संकेत वेंगुर्लेकर, शुभम बांदेकर, केदार कणबर्गी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा