निवृत्त कर्मचारी संघातर्फे उद्या पेन्शनर डे
सावंतवाडी,
सावंतवाडी-दोडामार्ग तालुका निवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सभा व पेन्शनर डे मंगळवार ११ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता सैनिक मुलांचे वसतिगृह – विश्रामगृह हॉल, जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ, सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. संघटनेच्या ज्या सभासदांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८० वर्षे पूर्ण केली असतील त्यांचे सत्कार होणार आहेत. यावेळी सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नंदादीप चोडणकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदूरकर व सचिव संभाजी कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कांबळे (८९८३८५३६५९) यांच्याशी संपर्क साधावा.