*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लेख*
*तयारी ….स्कॉलरशीप परीक्षेची. !*
लवकरच स्कॉलरशिप परीक्षा आहे. माझ्या भाचीची ही आहे, त्यामुळे तिला मी सतत सल्ले देते .घरातले सारे जण तिला काही ना काही सांगत असतात .अख्ख घरचं तिची परीक्षा घेतय आणि देतेय, पण मी तर म्हणेल एवढा बाऊ करण्याची किंवा घाबरायची गरजच नाही ..एरवी आपण जसा आणि जेवढा अभ्यास करतो तसाच अभ्यास किंबहुना त्यापेक्षा दोन-तीन तास जास्त या स्कॉलरशिप साठी करायचा आहे ..फक्त तुमचंमाध्यम मराठी- इंग्लिश त्यानुसार त्या भाषेत अभ्यासाला लागा आणि नुसताच अभ्यास नाही तर त्यानुसार विचार करून हे प्रश्न सोडवा. ज्ञान हे थोडं उपजत असतं ,आपण फक्त थोडे कष्ट, मेहनत, जिद्द ठेवायची असते. कार्य कारण भाव ,थोडे सायंटिफिक नॉलेज आणि पटकन सोडवण्याचं स्किल असलं तर मुलं- विद्यार्थी पटापट उत्तर देऊ शकतात. तुम्हाला क्विक आन्सर्स म्हणजे कमी वेळेत फास्ट उत्तर द्यायचे आहेत आणि त्याची सवय करून घ्यायची आहे. पुस्तक वाचताना नेहमी रीडिंग बिटवीन लाईन्स म्हणजे (लहानांना कळणार नाही )पण मोठे समजून घेतील. कविता ,गद्य पाठ ,उतारा ,संवाद हे नेहमी कामास येतं त्यामुळे शाळेच्या अभ्यासा व्यति रिक्त इतर पुस्तकही वाचणं गरजेचं आहे. गाईडन्स. – योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रेरणेने तसा अभ्यास आणि दिशा कळते. त्यासोबत हार्डवर्क, जिद्द ,सेल्फ स्टडी आणि योग्य लक्ष देऊन वेळेत पेपर संपवण्याचं कौशल्य केलं तर ते लवकर आत्मसात होऊन सरावाने सहज सोपं जातं..
म्हणी, वाक्प्रचार, अनेक शब्दांबद्दल एक शब्द ,सांख्यिकी आकडे, गुणाकार बेरीज तर कार्यकारणभाव ,दिशा, नातेसंबंध हे सतत सोडवत राहायचे म्हणजे आपण त्यानुसार पटकन उत्तर द्यायच्या तयारीत असतो.
दुसरं म्हणजे प्रश्न नीट वाचायचेत. हे काही आपले साधे प्रश्न नसतात .प्रत्येक प्रश्नात एक खोच असते. विचारलं काय ते आधी नीट बघायचं आणि शेवटी वेगळच काही विचारलेलं असतं.. त्यानुसार तो प्रश्न सोडवायचा. तुमच्या वाचनाचा वेग आकलन आणि त्यानंतर उत्तर काय हवंय यावर तुमची बुद्धिमत्ता तपासली जात असते.. बरं पर्यायी उत्तरही इतके सारखे आणि अपेक्षित असतात की आपण हमखास चुकतोच तेव्हा जे खात्रीचे प्रश्न येत असतील ते लगेच सोडून जे थोडा वेळ लागून उत्तर लिहायची आहेत ती 75 सेकंदात किंवा एका मिनिटात सोडून वेळ व्यवस्थित मॅनेज करायचा.
जुने पेपर जास्तीत जास्त वेळ लावून सोडवून सराव करावा म्हणजे आपण कुठे कमी पडतोय ते लगेच कळते. व त्यावरून फोकस करता येतो.. पालकांनी त्यांना खऱ्या परीक्षेसाठी कुठे डीस्टर्ब न करता टीव्ही मोबाईल पासून लांब ठेवून घरातच वेळेत पेपर सोडवायला लावायचा.. पाहुणे, जेवण त्यांची तयारी (मानसिक) पेपरला तयारी निशी बसवावे व पाठवावे.. कुठलेही टेन्शन न देता –घेता विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करून घ्यावी. आदल्या दिवशी आय कार्ड, पेन्सिल ,कपडे ,ड्रेस, कंपास, योग्य जेवण ,थकवा, शांत राहून मुलांना निश्चींत मनाने पेपरला पाठवावे….. बस मग विद्यार्थ्यांनो, यश आपलेच आहे….so all d best.
योगिनी पैठणकर नाशिक.