You are currently viewing डोंगरपाल येथे बुधवारी सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव

डोंगरपाल येथे बुधवारी सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव

डोंगरपाल येथे बुधवारी सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव*

बांदा

डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. १२ रोजी सकाळी १० वा.पुजाअर्चा व धार्मिक विधी,

दुपारी १ ते ३ महाप्रसाद,

दुपारी ३ ते ४ डोंगरपाल ग्रामस्थ, महिला व इच्छुक भाविकांचे भजन, सायं ४ ते ५ श्री स्वामी समर्थ मठ, डोंगरपाल यांचा हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८

नवस करणे, नवस फेडणे,

रात्रौ ८ ते ९ सुश्राव्य भजन,

रात्रौ ९ ते ११ पर्यंत पावणी,

रात्रौ ११ नंतर भंडारा (महाप्रसाद)

आदी कार्यक्रम होणार आहेत.

सुमारे ३०० वर्षांपूर्वी डोंगरपाल सिद्धाच्या डोंगरावर एका सिद्ध योगी महापुरुषाने जिवंत समाधी घेतली होती.या ठिकाणी भंडारा पौर्णिमेला दरवर्षी भंडारा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला महाराष्ट्र तसेच गोव्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस करण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात.

भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी आणि डोंगरपाल ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा