You are currently viewing पूर्व स्मृतींना मिळे उजाळा

पूर्व स्मृतींना मिळे उजाळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित स्नेहमेळाव्या निमित्त गीत*

 

स्नेह संम्मेलन आज केले आयोजित

पूर्व स्मृतींना मिळे उजाळा तंनिमित्त।।धृ।।

 

बालपणीच्या होती स्मृती कडू-गोड

रुसवे फुगवे तेव्हा घडत नकळत

पुन्हा दोस्ती मस्ती सारे होई पूर्ववत।।1।।

 

ऊन पाऊस लपंडाव पुढे जातो काळ

संसार रथ चक्रात रमावे मस्त

व्यथा संपे वाटते हलके मैत्रीनं।।2।।

 

*”अभिनव शाळे”* चे आहोत कृतज्ञ

चाळीस मित्र-मैत्रिणी होत एकसंघ

लाभले आदर्श शिक्षक असु भाग्यवंत।।3।।

 

पालक गुरूंचे लाभले सदा आशीर्वाद

मागे वळू न पहाता वाटते कृतकृत्य

कृतज्ञता सर्वांप्रती ठेऊ मैत्री जागृत।।4।।

 

श्री अरुण गांगल. कर्जत जिल्हा रायगड.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा