*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌴🌴माझ्या आईचा बगीचा🌴🌴
आईच्या बगिच्यात झाड प्राजक्ताचे
नंतर आलेली तगर अबोली कोरांटी जास्वंदी
रात्री प्राजक्ताचे झाड फुलायचे
सकाळी सुगंधी वातावरणाने सर्व आनंदी…
प्राजक्त सकाळी सर्वांना सुगंध देऊन रिता व्हायचा
तगर अबोली कोरांटी जास्वंदी वर पण बरसायचा
रात्री आपल्या फांद्याच्या कुशीत सर्वांना विसावून घ्यायचा
छोटी झाडे आणि नाजूक वेलही त्याच्या साथसावलीत भरभरून फुलायचा… …
मंगलतेचे आणि पावित्र्याचे मोती फुले वेचाया येती भक्त जन
उजळती क्षण मोहरती तन मन
सुगंधित होऊन जाई त्यांचे जीवन… ..
कुणास ठाऊक एकाएकी काय झाले
दृष्ट लागली काय काही कळेनासे झाले
पारिजातक थकला त्याचे बहरणे बंद झाले
छोट्या झाडांनी दुसरी जागा शोधून तिकडे बहरणे सुरू केले
पारिजात एकटा पडला मूकपणे अश्रू ढाळले
आता आप्तजन भक्त जन येईनासे झाले
निष्पर्ण पारिजाताचे फक्त खोड राहिले
आणि एक दिवस… उन्मळून पडले
आजही त्याच्या सुगंधी आठवणींनी मन भरून राहिलेले… … ..
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏

