You are currently viewing हिंदू हित हेच आपले ध्येय! : पालकमंत्री नितेश राणे

हिंदू हित हेच आपले ध्येय! : पालकमंत्री नितेश राणे

हिंदू हित हेच आपले ध्येय! : पालकमंत्री नितेश राणे. ;

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात पालकमंत्री नितेश राणे यांचे मौलिक मार्गदर्शन!

कुडाळ :

दत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये हिंदुत्ववादी मंत्री महोदय नितेश राणे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाचे हित पाळण्यासाठी मी इथे बसलो आहे आणि आपले हिंदूत्ववादी सरकार आहे आणि हिंदू हित हेच आपले ध्येय आहे, असा विश्वास या परिषदेमध्ये उपस्थित मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधींना दिला. सोबतच भूक, गरजा आणि कुटुंब यापेक्षाही आपणाला धर्म महत्त्वाचा आहे याबद्दलची जागृती उपस्थितांच्या मनात जागवली.
दत्त मंदिर न्यासाच्या बाजूला कृषी विभागाचे जमीन पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचे नुसते आश्वासन नाही तर पार्किंग सुरू करा अशी सूचना त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा