You are currently viewing केर गावात जंगली वन्यप्राणी शिकार करण्यासाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू घटनेने खळबळ

केर गावात जंगली वन्यप्राणी शिकार करण्यासाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू घटनेने खळबळ

केर गावात जंगली वन्यप्राणी शिकार करण्यासाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू घटनेने खळबळ

योग्य ती कारवाई करणार वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात जंगली वन्यप्राणी प्राणी याचा वावर आहे. अशा जंगली वन्यप्राणी प्राणी यांची शिकार करण्यासाठी केर गावात रस्ता कडेला असलेल्या घळणीच्या ठिकाणी जंगली प्राणी ये जा करतात अशा ठिकाणी शिकार करण्यासाठी लावलेल्या केबल फासकीत अडकून दिड वर्षाच्या बिबट्याचा जखमी अवस्थेत नंतर मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. केर गावातील ही पहिली घटना आहे.
दरम्यान याची गंभीर दखल वन विभाग यांनी घेतली आहे. या प्रकरणी तपास करून ज्याने कुणी फास लावले याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल असे दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल, कोनाळ वनपाल किशोर जंगले, बचाव पथक टीम, वन कर्मचारी केर गावात दाखल झाले. आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात सुटका केली. पण फासकीची केबल मानेवरून खाली पोटापर्यंत येऊन फास अधिक आवळला गेला जखम झाली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा