*शिक्षक क्षमता समृद्धी ट्रेनिंग सध्या फक्त प्राथमिक शिक्षकांचे होणार – आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नाला यश
*शैक्षणिक संशोधन परीक्षा परिषदेचे संचालक श्री राहुल रेखावर साहेब यांच्याशी आत्ताच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे बोलणे झाले, इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा 10 मार्चपासून सुरू होत आहेत , सदरचे ट्रेनिंग रद्द करावे अशी मागणी आमदार सरांनी केली,*
**त्यावर उपाय म्हणून माननीय श्री राहुल रेखावर साहेबांनी फक्त इयत्ता पहिली ते पाचवी ज्यांचा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी काही संबंध नसेल अशा शिक्षकांच ट्रेनिंग घेतले जाईल बाकीच्या शिक्षकांचे ट्रेनिंग दहावी बारावीची परीक्षा झाल्यानंतर घेऊ असे आश्वासन संचालक साहेबांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना दिले*
*इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान परीक्षा परिषदेने “शिक्षक क्षमता समृद्धी” शिक्षकांचे ट्रेनिंग दिनांक 10 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत आयोजित केलेले आहे, सदरचे ट्रेनिंग रद्द करून परीक्षा झाल्यानंतर घ्यावे याकरता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी श्री रेखावर साहेब यांना आज निवेदन दिले आहे*
*—- प्रशांत भामरे*
*अध्यक्ष कोकण विभाग शिवछत्रपती शिक्षक संघटना*