You are currently viewing राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्री प्रथम…

राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्री प्रथम…

राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हेमांगी मेस्त्री प्रथम…

सावंतवाडी

अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षांखालील शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात २९५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकाविले. तिची राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला कोच मंगेश घोगळे, देवगड पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, पोलीस उपनिरीक्षक संजय साटम, गणेश वांगणकर, डॉ. शशांक साटम यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सीए लक्ष्मण नाईक, श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा