शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते “एकनाथ शिंदे चषक 2025” क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन !
कुडाळ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजेश सावंत मित्रमंडळ व महापुरुष क्रिकेट संघ, कडावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकनाथ शिंदे चषक 2025” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी मैदानात उतरून बॅटिंग करत खेळाचा आनंदही घेतला.उद्घाटन सोहळ्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, दादा साईल, अरविंद करलकर, तसेच आयोजक प्रजेश सावंत, स्वरूप वाळके यांसह मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईला संघटन, जिद्द, शिस्त आणि विजयाचा निर्धार या मूल्यांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. शिवसेना नेहमीच खेळ व युवा विकासाला प्रोत्साहन देत आली आहे आणि यापुढेही देत राहील.यावेळी उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. स्पर्धेतील सर्व संघांना शुभेच्छा देत, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.