मुंबई :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाईन करण्यासाठीची साईट भारतीय मजदूर संघ पदाधिकारी यांच्या सोबत झालेल्या मंत्रालय स्तरावरील बैठकीच्या मागणीनुसार सर्वांसाठी खुली करून कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या वतीने कामगार मंत्री यांचे अभिनंदन करण्यात आले. भारतीय मजदूर संघातर्फे, केंद्र सरकारने कामगार कायद्यांचे ४ लेबर कोड मध्ये रूपांतर केल्याच्या पार्श्वभूमीवर मजदूर संघाची भूमिका विषद करण्यासाठी ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था परेल मुंबई येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ऍड.आकाश फुंडकर उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ साईट सर्वांसाठी खुली करून महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना दिलासा दिल्याबद्दल बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री हरी चव्हाण यांच्या वतीने अभिनंदन केले. यावेळी भारतीय मजदूर संघ प्रदेश अध्यक्ष ऍड. अनिल ढुमणे, क्षेत्रीय संघटन मंत्री सी.व्ही.राजेश, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, श्रीपाद कुटासकर,प्रविण जाधव, ओमकार गुरव, जयंत शेटये उपस्थित होते.