You are currently viewing बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरविंद कुलकर्णी लिखित अप्रतिम कविता*

 

*बाईपण भारी देवा*

 

संस्काराची दोरी हाती

पूर्ण शक्तिनिशी कार्य

जन्म बाईचा पुण्याई

द्यावे तिला सहकार्य…(१)

 

पुराणकाळात नारी

सर्वांनाच वंदनीय

बाई झुंजली एकाकी

होती ती अतुलनीय…(२)

 

संगोपन व शिक्षण

घेते ती जबाबदारी

सारे क्षेत्र गाजवले

घेई गगनभरारी…(३)

 

जडणघडण सारी

तीची कार्यकुशलता

वेळ अग्निपरीक्षेची

सिद्ध केली महानता…(४)

 

बाई शाश्वत प्रेरक

तिचा जिव्हाळा मातृत्व

राही सर्वदा अग्रणी

तिची थोरवी कर्तृत्व…(५)

 

राहो अखंड स्मरण

द्यावा हक्क तिचा तिला

बाईपण भारी देवा

मिळे वेग प्रगतीला…(६)

 

*अरविंद कुळकर्णी*

*मलकापूर*

प्रतिक्रिया व्यक्त करा