You are currently viewing धामापूर बौध्दवाडी शाळेत पाककृती स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न

धामापूर बौध्दवाडी शाळेत पाककृती स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न

धामापूर बौध्दवाडी शाळेत पाककृती स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न

मालवण

धामापूर बौध्दवाडी येथील उपक्रमशील जि. प.प्राथमिक शाळेत शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी तृणधान्य पाककलाकृती स्पर्धा धामापूर माजी सरपंचां सौं सप्ताशीला धामपूरकर यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.शासनाने हे वर्ष अंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर केले आहे या अनुषंगाने शाळेत सर्व माता पालकांसाठी व स्वयंपाकी यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये पालकांनी नाचणीच्या शेवया, भाकरी भाजी, शिरा, संतूचा ढोकळा, घावणे नारळ रस, तांदूळ लाडू, ज्वारिची इडली,उसळ,इडली चटणी, तांदूळ ढोकळा, पास्ता,असे छान पदार्थ महिलांनी बनवले. यावेळी अंगणवाडी सेविका श्रीम शीतल नाईक मॅडम व माजी सरपंच सौं सप्तशिला धामपूरकर मॅडम यांनी परीक्षण केले त्यानंतर 1 ते 3 क्रमांक काढून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक बक्षीस सौं मानसी परब सरपंच धामापूर यांच्या सौजन्यने सौं शमिका चेंदवणकर यांना देण्यात आले व द्वितीय क्रमांक बक्षीस श्री स्वप्नील नाईक ग्रा. पं सदस्य यांच्या सौजन्यने सौं सोनम कदम यांना देण्यात आले व तृतीय क्रमांक बक्षीस सौं साक्षी नाईक ग्रा. पं सदस्य यांच्या सौजन्यने सौं सुमिता नाईक यांना देण्यात आले. तसेंच सहभागी सर्वांना भेटवस्तू उद्योजक श्री महेश परब यांच्या वतीने देण्यात आले.यामध्ये 09 पालकांनी सहभाग घेतला. त्यानंतर माजी सरपंच सौं धामपूरकर मॅडम यांनी मनोगत वक्त करताना शाळेच्या या नावीन्य पूर्ण उपक्रमाचे व शाळेचे उपक्रमशील आदर्श शिक्षक श्री गोसावी सरांचे व शाळेच्या शिक्षिका श्रीम लोखंडे मॅडम यांचे कौतुक केले.. महिलांनी देखील आतील उपलब्ध साहित्यपासून बनवलेल्या पदार्थचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेंच श्री विजयकुमार धामापूरकर माजी उपसरपंच यांनी देखील शुभेच्छा दिल्या.यावेळी सौं संजना जाधव , सौं सुमिता नाईक, सौं जागृती नाईक, सौं सोनम कदम ,सौं सुरभी नाईक, सौं विद्या कदम, सौं प्राजु कदम , सौं रंजिता धामपूरकर, सौं शमिका चेंदवणकर, अंगणवाडी सेविका श्रीम. शीतल नाईक व मदतनीस सौं अश्विनी धामपूरकर व अनेक पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोसावी सर यांनी केले व सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका श्रीम लोखंडे मॅडम यांनी मानले.. खरोखरच या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा