You are currently viewing आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन

आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन

मालवण :

आंगणेवाडीचा भराडी देवीचा वार्षिक उत्सव यंदा २२ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त भरणाऱ्या जत्रेत सहभागी होणाऱ्या कोकणवासीयांच्या सुविधेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान २२ डब्यांच्या दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे.

या विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारी, ९ फेब्रुवारीपासून खुले होणार आहे. रेल्वे स्थानकावरील प्रवासी आरक्षण प्रणाली आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून प्रवाशांना आरक्षण करता येईल.

 

गाडी क्र. ०११२९/०११३०

ही गाडी एलटीटी येथून २१ फेब्रुवारीला रात्री १२.५५ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून २१ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१०ला एलटीटीला पोहोचेल.

 

गाडी क्र. ०११३१/०११३२

ही गाडी एलटीटी येथून २२ फेब्रुवारीला रात्री १२.५५ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी स. ६.१० वाजता एलटीटी येथे संपेल.

थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

डब्यांची संरचना : सेकंड एसी – एक, थर्ड एसी – सहा, स्लीपर – नऊ, जनरल – चार, जनरेटर – एक आणि एसएलआर – एक.

प्रतिक्रिया व्यक्त करा