कट्टा येथे ८ फेब्रुवारीला तबलावादन, गायन कार्यक्रमाचे आयोजन…
मालवण
कट्टा येथील संगीत विद्यालयाच्या वतीने जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे तबलावादन व गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात तबला वादन तबला विशारद अर्जुन पेंडूरकर व शिष्य परिवार हे करणार आहेत तर गायन गायन विशारद रवीना पांजरी करणार आहेत. त्यांना संगीत साथ निलेश गवंडी, हार्मोनियम साथ मंगेश कदम हे देणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.