You are currently viewing कुंचला

कुंचला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य रचना*

 

*कुंचला*

 

कुंचला

रंगरेषांचे जाळे

शुभ्र कागदावर उतरवतो

मनातील भाव भावना सगळे…

 

कुंचला

कधी पानगळ

शुष्क उदास फांदी

कधी तांबडी कोवळी हिरवळ..

.

कुंचला

रंगांशी खेळतो

निळे आकाश चंद्रचांदण्यांचे

काळ्या आईला घट्ट बिलगतो…

 

कुंचला

सूर्योदयाच्या रंगछटा

सांजेला केशर गोल

पोटी घेती सागर लाटा…..

 

कुंचला

चिवचिवते चिमणी

रंग पहाट उगवते

सोन किरणे गाती गाणी…

 

कुंचला

एकटाच असतो

फिके गडद रंगासवे

घेऊन चित्र सुंदर रेखाटतो….!!

 

🖌️🎨🖌️🎨🎨🖌️🎨

अरुणा दुद्दलवार

दिग्रस यवतमाळ ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा