*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८४ वे
अध्याय -१४ वा , कविता – ६ वी
___________________________
पाण्यात नाव बुडू लागली । काठावरची लोक म्हणाली ।
माणसे या नावेतली । आता काही वाचत नाही ।। १।।
स्वामी शिष्यांना म्हणती । धीर धरा तुमच्या चित्ती ।
सोडा मनाची भीती । करील रक्षण तुमचे माय नर्मदा ।।२।।
बोलले स्वामी,तसेच झाले । नर्मदेने नावेस कर लाविले ।
छिद्र नावेचे बुजले । आली वरती नाव पुन्हा ।। ३ ।।
शिष्य विचारी स्वामींना ।कोण होती स्त्री,आम्हा सांगाना ।
स्वामी सांगती त्यांना । अरे होती प्रत्यक्ष नर्मदा ।। ४ ।।
यात्रेवरून सारे परतले । शेगावी आले । हकीकत सांगू लागले । संकटी रक्षिले स्वामी गजाननांनी ।। ५ ।।
माधवनाथाचे शिष्य भले । सदाशिव उर्फ तात्या शेगावी आले । मठात दर्शना गेले । श्री गजानन स्वामींच्या ।। ६ ।।
बंधूची पोरे आले । भेटीने गजानन आनंदले । तात्यास म्हणाले । गुरूंना तुमच्या, द्या राहिलेला विडा तुम्ही ।।७। ।
तात्यांनी तसेच केले । आपल्या गुरूंना विडा देत विचारले ।
तुम्ही गजानना कधी भेटले । सांगावे आम्हाला ।। ८ । ।
माधवनाथ म्हणे- किमया योगाची असे । स्मरण हीच भेट असे । स्वामींना हे सहज शक्य असे । थोर योगीराज स्वामी गजानन हो ।। ९ ।।
*********
अध्याय- १४ वा श्री गजानन चरणी अर्पणमस्तू ।।
********
अध्याय -१५ वा, क्रमशः करी लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास- अरुण वि.देशपांडे- पुणे.
__________________________