*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वयाचं काय घेऊन बसलात..!!*
वयाचं काय घेऊन बसलात
वय हे चोरण्याकरताचं असतं
बरचं काही अजून व्हायचं
तोपर्यंत हिरवंगार राहायचं असतं..
आरश्यातलं स्वतःचं प्रतिबिंब
नाहीचं माझं!आरश्याला सांगायचं असत
वय हे सदैव चोरून लपवायला
पांढ-या केसांना रंगवायला लागत
इसवीसन मागे फरपटत आलं जरी
आपला इतिहास झाकावाचं लागतो
राज्याची सीमा अधिक वाढू न देता
भूगोल देहाचा ताब्यात ठेवावा लागतो
अकाली म्हातारपणं !म्हातारचळं
आलेल्यांना नकळत! टाळायचं असतं
आपलं ज्ञान जेमतेमं का असेना
तरूणाईशी जवळीक !गरजेचं असतं
व्यक्तीमत्व आपलं कसं का असेना
अपने स्टाईलमें रहने का!!
कुणी काही का म्हणेना…भिडू
जिंदगी अपने ही स्टाईलमें जीने का!
जिंदगी अपनी!स्टाईल अपनी!!
वयाचं काय घेऊन बसलात..!!
बाबा ठाकूर